Gautam Gambhir : ‘राजकीय कर्तव्यातून मुक्त करा’, पहिली यादी येण्यापूर्वीच गौतमची ‘इलेक्शन रिटायरमेंट’

  • Written By: Published:
Gautam Gambhir : ‘राजकीय कर्तव्यातून मुक्त करा’, पहिली यादी येण्यापूर्वीच गौतमची ‘इलेक्शन रिटायरमेंट’

‘Relieve me of my political duties’: Gautam Gambhir urges BJP chief :   माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) शनिवारी (दि. 2) त्याच्या X अकाउंटवरून ट्विट करत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गंभीरकडून अशाप्रकारे विनंती करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, ती यादी येण्यापूर्वीच गौतमने ट्विट करत त्याची ‘इलेक्शन रिटायरमेंट’ घेत असल्याचे एकप्रकारे संकेत दिले आहेत.

 

गौतमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, भाजपने मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. मात्र, आता मला क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करावे असे गंभीरने नमुद केले आहे. गंभीरच्या या विनंतीनंतर आता भाजप पूर्व दिल्लीतून कोणत्या उमेदवाराला तिकीट देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांनी महारोजगार मेळावा भरवला : आप नेत्याने ‘पोलखोल’ केली

पहिल्या यादीत विजयी उमेदवारांची नावे

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी दोन दिवसांपूर्वी भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. यात 100 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, ज्या जागांवर भाजपनं विजयी पताका फडकवली आहे. त्या जागा आणि उमेदवरांची नावे पहिल्या यादीत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, पहिली यादी येण्यापूर्वीच गंभीरनं राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

LokSabha election: महादेव जानकर माढ्यातूनच लोकसभा लढविणार; रासपच्या नेत्याने सांगितलं ‘प्लॅनिंग’

भाजपकडून जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसारख्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश असू शकतो. भाजपच्या पहिल्या यादीत ज्या जागांची घोषणा होऊ शकते त्यात वाराणसी, गांधीनगर, अमेठी, नागपूर, लखनौ यांचा समावेश असू शकतो असेही सांगितले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube