Sanjay Raut : नड्डांचा सल्ला 25 लाखांचा पेन 15 लाखांचा सूट वापरणाऱ्या मोदींना लागू; राऊतांचा टोला
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी निमित्त होत ते नड्डा यांनी मुंबई दौऱ्यदरम्यानचं वक्तव्य यावर राऊत म्हणाले की, 25 लाखांचा पेन 15 लाखांचा सूट वापरणारे पंतप्रधान मोदीच गरिबीचे ढोंग करतात. काय म्हणाले होते नड्डा पाहूयात…
मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची धाड
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला. ते म्हणाले सामान्य जनतेत जाताना साधी राहणी ठेवा, महागडी घड्याळं आणि गाड्यांचा वापर करू नका. त्यावरून संजय राऊत यांनी नड्डा यांच्यासह मोदी यांना टोला लगावला.
‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी
राऊत म्हणाले की, जेपी नड्डा यांचा हा सल्ला पंतप्रधान मोदींना लागू होतो. कारण मोदी हे खिशाला जो पेन लावतात तो 25 लाखांचा आहे आणि त्यांचा सूट 15 लाखांचा आहे. हा मोदींचा सगळा थाट श्रीमंती आहे. गेल्या सत्तर वर्षांमध्ये देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी इतकी श्रीमंती उपभोगली नव्हती. तसेच भाजपच्या 100% नेत्यांच्या हातात महागडी घड्याळ 90% नेते आणि कार्यकर्त्यांकडे आलिशान गाड्या आहेत. पण महाराष्ट्रच नव्हे तर देशातील जनतेने ठरवले आहे की, यांचे महागडे सूट आणि महागडी घड्याळं उतरवायची. त्यामुळे जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन ज्ञान पाजळू नये. असंही यावेळी राऊत म्हणाले.
तसेच याच बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सरकारची दहा वर्षे हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है. पुढील पाच वर्षे या दहा वर्षांपेक्षा भारी असतील असा दावा फडणवीस यांनी केला. ते मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देताना बोलत होते.