Ahilyanagar Kajal Guru Death : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून तृतीयपंथीय समाजासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तृतीयपंथीय नागरिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा (Kajal Guru Death) आजाराने निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी (Transgender Citizens Association) अखेरचा श्वास घेतला.
प्रभावशाली आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व
काजल गुरू या तृतीयपंथीय समाजातील अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी (Ahilyanagar News) व्यक्तिमत्व मानल्या जात होत्या. समाजाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तृतीयपंथीयांना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलन, जनजागृती मोहीमा आणि प्रशासनाशी संवाद साधला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तृतीयपंथीयांचा आवाज सत्तेच्या पातळीपर्यंत पोहोचला होता.
तृतीयपंथीय समाजाच्या समस्यांकडे लक्ष वेधले
काजल गुरु यांनी केवळ समाजकारणातच नव्हे तर स्थानिक राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. विविध निवडणुकांमध्ये उमेदवारांचा प्रचार करून त्यांनी तृतीयपंथीय समाजाच्या समस्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले. अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती आणि जाज्वल्य भूमिका नेहमीच चर्चेत राहिली.
कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, 7 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
तृतीयपंथीयांचा आधारस्तंभ हरपला
त्यांच्या निधनामुळे तृतीयपंथीय समाजात शोककळा पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिकांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. “काजल गुरु यांच्या जाण्याने तृतीयपंथीय समाजाचा एक मोठा आवाज कायमचा थांबला, अशी भावना व्यक्त होत आहे.