Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग 4 मध्ये एमआयएमला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेवक समद खान यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार शम्स खान यांनी त्यांचा 135 मतांनी पराभव केला आहे. समद खान यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला आहे. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक चार मध्ये एमआयएमचे दोन उमेदवार विजय झाले असून काँग्रेसने दोन जागांवर बाजी मारली आहे. एमआयएमकडून शहेबाज शेख आणि शहनाज खालिद यांचा विजय झाला आहे तर काँग्रेसकडून मिनाज खान आणि शम्स खान यांनी बाजी मारली आहे. समद खान 2003 पासून नगरसेवक होते त्यामुळे त्यांच्या पराभव अनेकांना धक्का देणारा ठरला आहे.
तर दुसरीकडे अहिल्यानगर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता आणली आहे. शहरात युतीचे 50 पेक्षा जास्त उमेदवारांनी बाजी मारली आहे आणि शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवार जिंकले आहे. तर सर्वांना धक्का देत प्रभाग क्रमांक 10 अ मधून बहुजन पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून अमोल येवले, विजय पठारे ,सुनिता कांबळे आणि वर्षा काकडे विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून मीना चोपडा विजय झाले आहे.
प्रभाग क्रमांक 2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सागर बोरुडे विजयी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर विजयी
भाजपच्या उमेदवार दीपाली बारस्कर विजयी
भाजपच्या उमेदवार शारदा ढवण विजयी
प्रभाग क्रमांक 4
शहेबाज शेख (एमआयएम)
शहनाज खालिद (एमआयएम)
मिनाज खान (काँग्रेस)
शम्स खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश बनसोडे विजयी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता पडोळे विजयी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिता शेटीया विजयी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले विजयी
प्रभाग क्रमांक 15
भाजपच्या दत्ता गाडळकर यांच्याकडून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जाधव यांचा पराभव
भाजपच्या सुजय मोहिते यांच्याकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांचा पराभव
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पौर्णिमा गव्हाळे यांचा विजय
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार गीतांजली काळे यांचा विजय
प्रभाग क्रमांक 16
भाजपच्या विजय पठारे यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओंकार सातपुते यांचा पराभव
भाजपच्या अमोल येवले यांच्याकडून अपक्ष उमेदवार हर्षवर्धन कोतकर यांचा पराभव
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता कांबळे विजयी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा काकडे विजयी
प्रभाग क्रमांक 17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर बांगरे विजयी
अजित ओवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी लोंढे विजयी
भाजपच्या उमेदवार कमल कोतकर विजयी
भाजपचे उमेदवार मनोज कोतकर विजयी
प्रभाग क्रमांक 12
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे विजयी
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आसाराम कावरे विजयी
मोठी बातमी! इचलकंरजी – कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
