बीडच्या परळीत मोठी राजकीय घडामोड; एमआयएम शिंदेसेनेची युती झाली अन् तुटली
राष्ट्रवादी- भाजप आणि शिवसेनेची युती असून गटनेतेच्या निवड प्रक्रियादरम्यान एमआयएमने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीच्या गटनेता निवडीत (Beed) शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसला एमआयएमने पाठिंबा देत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेना आणि एमआयएमची युती झाली असे आरोप शिवसेनेवर झाल्यानंतर शिवसेनेने आपण एमआयएमसोबत गेलो नाहीत आणि युतीही केली नाही असं स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी- भाजप आणि शिवसेनेची युती असून गटनेतेच्या निवड प्रक्रियादरम्यान एमआयएमने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. यात आमच्या कुठलाही सहभाग नाही एक तर एमआयएमला बाजूला काढा नाही तर आम्हाला गटामधून जाण्याची परवानगी द्या अशी भूमिका शिवसेनेने जाहीर केली. त्यानंतर स्वतःहून एमआयएमच्या नगरसेविका शेख आयाशा यांनी गटनेते वैजनाथ भानुदास राव सोळंके यांच्याकडे बाहेर पडण्याचा निर्णय घेत पत्र दिले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमोर सह्या केल्या त्यावेळी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केलेला नाही. एमआयएमला आम्ही जवळ केले नाही. हिंदुत्वाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही. एक तर तुमच्या सोबत शिवसेना राहील किंवा एमआयएम आम्ही दोघेही या गटात राहू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तर अंबादास दानवे यांचे डोकं चंद्रकांत खैरे यांनी रिकामे केले. अशी टीका देखील मुळुक यांनी यावेळी केली.
परळी नगरपालिकेतील सध्याचं संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 16
भाजप – 7
शिवसेना (शिंदे गट) – 2
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 2
काँग्रेस – 1
एमआयएम – 1
अपक्ष – 6
