मंत्रिपदासाठी शिंदेंचे आमदार बाशिंग बांधून तयार पण…; रोहित पवारांची शिवसेनेवर बोचरी टीका
MLA Rohit Pawar Speak On Shivsena : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार व कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे राजयाचे लक्ष लागलेले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. सध्या शिंदे गटाचे काही आमदार कपडे शिवून तयार आहेत. आपल्याला मंत्रिपद कधी मिळेल या अपेक्षाने ते आतापासूनच बाशिंग बांधून तयार आहेत, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
कर्जत येथे सद्गुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्जत – जामखेडचे आमदार रोहित यांनी मंत्रिमंडळ विस्तार व मंत्रिपदाच्या अपेक्षा धरून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकत नाही. मात्र सध्या या मंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या पाहता आमच्या सारख्या नेत्यांना दुःख वाटत आहे.
अब चाँद पे पाँव जमाना है…! चांद्रयान-3 लॉन्चिंगपूर्वी ऑनलाईनच्या दुनियेत काय होतयं ट्रेन्ड
आज आपण पाहिले तर वर्षभरापासून शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल ही अपेक्षा ठेऊन आहे. मंत्रिपदासाठी तर अनेक आमदार बाशिंग बांधून तयार आहे की आपल्याला मंत्रिपद मिळेल. मात्र असे काही झाले नाही उलट त्यांची ताकद आता कमी झाली आहे. गोगावले स्वतः बोलले आहे की, आधी आम्ही अर्धी भाकर खायचो मात्र आता चतकूर तुकड्यावर आलो आहे. असे करता करता ते कधी तुकड्यावर येतील हे सांगता येणार नाही, अशा शब्दात आमदार पवार यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
‘आधी तुमच्या गळ्यातल्या गुलामीच्या पट्ट्याची काळजी करा’; राऊतांचा शिंदेंवर पलटवार
सत्तेसाठी जेव्हा विचार बदलले जातात तेव्हा असे प्रकार होत असतात. तुम्ही आता शिंदे गटाची अवस्था पाहत असाल काय झाली आहे. अशीच अवस्था आता जे भाजपसोबत नव्याने सामील झालेले आहेत यांची होऊ नये असे म्हणतच पवार यांनी अजित पवार गटाचा नामोउल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण भाजपची प्रवृत्ती पहिली तर लोकनेत्याना ते संपवतात. लोकांमधील असलेल्या पक्षाला ते संपवतात. आता हीच भीती जे राष्ट्रवादीतून त्यांच्यासोबत सामील झाले आहे त्यांची होती की काय ? अशी भीती आता वाटू लागली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.