‘आधी तुमच्या गळ्यातल्या गुलामीच्या पट्ट्याची काळजी करा’; राऊतांचा शिंदेंवर पलटवार

‘आधी तुमच्या गळ्यातल्या गुलामीच्या पट्ट्याची काळजी करा’; राऊतांचा शिंदेंवर पलटवार

Sanjay Raut replies Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आधी तुमच्या गळ्यात गुलामीचा जो पट्टा पडला आहे त्याकडे आधी पहा. आमचा मेडिकलचा पट्टा उतरला. या पट्ट्याची तुम्ही काळजी करा. गुलामीचे पट्टे हे असे अनेकांच्या गळ्यात आहेत. जे ऐश आरामात राहतात. वैभवात राहतात. पण गळ्यात गुलामीचा पट्टा असतो, अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेंचा समाचार घेतला.

पवार फक्त हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल; थोरातांच्या विधानाने अजितदादांचं टेन्शन वाढलं

काल ठाण्यातील सभेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पट्टा लावण्याची भीती दाखविली जाते. मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या गळ्याला पट्टा होता तो पट्टा आम्ही उतरवला असे शिंदे म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त करत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. आमचा मेडिकलचा पट्टा केव्हाच उतरला आहे. पण, तुमच्या गळ्यात जो गुलामीचा पट्टा पडला आहे त्याची काळजी करा, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.

मणिपूर जळतंय, काही लोकांच्या कमिशनसाठी पंतप्रधान राफेलच्या करारात व्यस्त

केंद्रातील मोदी सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. आता हा देश पूर्णपणे हुकूमशाहीकडे वळला आहे. दिल्लीतील लोक पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत. तडफडत आहेत. मणिपूर जळत आहेत तर पंतप्रधान तिकडे फ्रान्समध्ये राफेलचा सौदा करत आहेत. कोणासाठी तर काही लोकांना त्यात कमिशन मिळावं म्हणून. ही हुकूमशाहीच आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना संपवायचं. सरकार पाडायची. दहशत निर्माण करायची याला हुकूमशाही नाही म्हणणार तर काय म्हणणार, असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जळजळीत टीका केली.

समितीसाठी भांडले पण, ऐनवेळी नावच गायब; ऊस दर नियंत्रण समितीतून राजू शेट्टींना डच्चू!

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube