शिंदेंवर टीका करायचे पण फडणवीसांना.., दादांच्या बंडानंतर काँग्रेस नेत्याचा मोठं विधान…

शिंदेंवर टीका करायचे पण फडणवीसांना.., दादांच्या बंडानंतर काँग्रेस नेत्याचा मोठं विधान…

Balasaheb Thorat : अजित पवार महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायचे पण देवेंद्र फडणवीसांना मोकळं सोडायचे, असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) सांगितलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब थोरातांनी अजितदादांच्या बंडावर दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.

मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत का जावं लागलं? फडणवीसांनी सांगितलं कारण…

थोरात म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीने उत्तम पद्धतीने काम केलं आहे. महाविकास आघाडीत असं कधी होईल, असं वाटलं नव्हत, पण अजित पवारांचं काहीतरी शिजतंय याचा वास येत होता, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे.

Ncp Crisis : साहेबांची ‘ही’ गुगली असेल तर 4 वर्षांनी कळेल, दादांच्या आमदाराचं मोठं विधान…

तसेच ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पार पडत होत्या. त्यावेळी सभेत भाषण करताना अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करीत होते, पण देवेंद्र फडणवीसांना ते मोकळे सोडायचे, असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अजित पवारांनी याआधीही फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली, असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल…

दरम्यान, मागील काही दिवसांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचं पाहायल मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यामध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीचे इतर दिग्गज नेतेही आहेत. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, अमोल मिटकरी, किरण लहामटे, निलेश लंके, संग्राम जगताप यांच्यासह इतर आमदारांनी सत्ताधारी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीत उभी फुट पडल्याचं स्पष्ट झालं असून महाविकास आघाडीत आता काँग्रेसच मोठा पक्ष असल्याचं मानलं जात आहे.

अजितदादांच्या बंडानंतर महाविकास आघाडीच ताकद आणखीनच वाढली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयात त्रास होणं चांगलं नसल्याचंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube