शेअर मार्केट घोटाळा, आर्थिक तडजोड पोलीस निरीक्षकाला भोवली; गुन्हे शाखेतील राठोड निलंबित

Share Market Scam : शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर

Share Market Scam

Share Market Scam

Share Market Scam : शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी (21 जुलै) रात्री याबाबतचे आदेश काढले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमक प्रकरण काय?

शेवगाव (Shevgaon) येथील शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा (Share Market Scam) झाल्याची चर्चा राज्यभरार्चा झाली होती. विशेष म्हणजे अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. जादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र कोट्यवधींच्या घोटाळा व यातच गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यानच संबंधित गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप पुढे आले. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार , आर्थिक गुन्हे शाखेच्या अंमलदार दिनेश राठोड याने वारंवार व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तक्रारदार त्यांच्याशी संपर्क साधला.

चौकशीच्या नावाखाली नोटिसा बजावून भेटण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर, तुम्हालाही या गुन्ह्यात आरोपी केले जाईल, अशी भीती दाखवत स्वतःसह वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देत PM मोदींच्या घरापर्यंत राहुल गांधी कसे पोहचले? वाचा आंदोलनाचा सिक्रेट प्लॅन

संबंधित गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षकांकडून या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात प्रथमदर्शनी आरोप गांभीर्याने घेण्याजोगे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिनेश राठोड याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version