Ahilyanagar SP’s action betel nut and tobacco stock worth crores of rupees seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) राहुरी येथील चिंचोली शिवारातून दोनशे टन लाल सुपारीसह आठ टन तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत 13 ट्रकसह 8 कोटी 43 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हा माल कर्नाटकातून दिल्लीला जात असल्याचं सांगितलं जातंय. संशयास्पद बाबींमुळे ट्रकसह सर्व वस्तू जप्त केल्या असून, राज्य व केंद्रीय जीएसटी विभागाला या कारवाईची माहिती दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, ही सुपारी व तंबाखू कर चुकवून आणली असल्याचे प्राथमिक पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
जरांगेंना भेटा, चर्चा करा! संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘आंदोलनाची चेष्टा…’
करोडोंचा माल जप्त
राहुरी पोलीस ठाणे हद्दीत चिंचोली (ता. राहुरी) (Ahilyanagar) येथे हॉटेलमध्ये सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची माहिती दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते. कारवाईत 6 कोटींपेक्षा जास्त किंमतीची 2 लाख 5 हजार 950 किलो लाल सुपारी, 15 लाखांपेक्षा जास्त किंमतीची सात हजार 800 किलो तंबाखू तर दोन कोटी 10 लाखांचे 13 ट्रक असे एकूण 8 कोटी 43 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
अबब! भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीटाची किंमत 15 लाख रुपये; तिकीटांचा काळा बाजार फोफावला
पोलीस अधीक्षकांकडून कारवाईची माहिती
स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Ahilyanagar) यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की, “जप्त केलेल्या ट्रकपैकी दहा ट्रकचे चालक आढळले, पण तीन ट्रकचे चालक गायब आहेत. कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. सुपारी आणि तंबाखू कर चुकवून चालल्याचे प्रथमदर्शनी आढळले. चालकांकडे चौकशी केली असता हा माल दिल्लीतील एका फर्मचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे ई वे बिल नव्हते. एक हस्तलिखित बिल्टी असून, माल पोहोच करण्याचा पत्ता दिल्ली असा आहे. प्रत्येकाने चौकशीत वेगवेगळी माहिती दिल्याने संशय बळावला. या संदर्भात जीएसटीच्या राज्य आणि केंद्रीय विभागाला आणि अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली आहे. याचा वापर माव्यासाठी होणार होता का? दिल्लीचा पत्ता असला तरी काही माल जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात उतरवला जाणार होता का? याचीही चौकशी केली जाईल”, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.