अबब! भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीटाची किंमत 15 लाख रुपये; तिकीटांचा काळा बाजार फोफावला

अबब! भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीटाची किंमत 15 लाख रुपये; तिकीटांचा काळा बाजार फोफावला

IND vs PAK, Asia Cup 2025 : आशिया कप टूर्नामेंट येत्या 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार (Asia Cup 2025) आहे. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) भिडणार आहेत. 14 सप्टेंबर रोजी दोन्ही संघात सामना होणार आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यामुळे टीम इंडियानेही (Team India) पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी अनेकांनी केली आहे. परंतु, आशिया कप स्पर्धा त्रयस्थ देशात होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत दोन्ही संघात सामना होणार आहे.

स्पर्धेतील सामन्यांची तिकीटे अजून लाँचही झालेली नाहीत मात्र त्याआधीच तिकीट खरेदीसाठीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (India vs Pakistan) सामन्याची तिकीटे ब्लॅक मार्केटमध्ये तब्बल 15 लाख रुपयांत विकली जात आहे. तिकीटांचा हा काळाबाजार सध्या चांगलाच फोफावला आहे.

मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने मोफत; हॉकी इंडियाचा मोठा निर्णय

ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. यातच 9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धा सुरू होत आहे. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामन्यांना भारत सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानला भिडताना दिसेल. भारताचा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांनाही प्रतिक्षा आहे. सामन्याच्या तिकीटांसाठी आतापासूनच मारामारी सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार तिकीटांची विक्री येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे.

तिकीटांची अधिकृत विक्री सुरू होण्याआधीच या तिकीटांचा काळा बाजार फोफावला आहे. या मार्केटमध्ये 15 लाख 75 हजार रुपयांत तिकीट उपलब्ध आहे. काही वेबसाइट्सवरून या तिकीटांची विक्री होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. अमिरात क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अशा संशयास्पद वेबसाइट्सच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन क्रिकेट चाहत्यांना केले आहे.

बोर्डाने या संदर्भात सोशल मीडियावर एक अलर्ट जारी केला आहे. तिकीटांची अधिकृत विक्री सुरू झाल्यानंतरच अधिकृत वेबसाइट्सवरून तिकीट खरेदी करा असे आवाहन बोर्डाने केले आहे. एशियन क्रिकेट काउंसिलने स्पर्धेच्या तिकीटांची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, काही बनावट वेबसाइट्सने या आधीच तिकीटांची विक्री सुरू केली आहे. यामध्ये सामन्यासाठीच्या एका तिकीटाची किंमत 26 हजार 256 रुपयांपासून 15.75 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

कोट्यवधीची डील संपली! ड्रीम 11 ने मोडला BCCI सोबतचा करार, आशिया कप जर्सीवरून नाव गायब

follow us
  • fb
  • instagram
  • youtube