ऊसदराचा तिढा कायम! 3,700 रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम; तोडगा न निघाल्यास 28 तारखेपासून आंदोलनाचा इशारा

Sugarcane Rate Raju Shetty: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ठाम आहेत.

Sugarcane Rate Raju Shetty: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ठाम आहेत.

Sugarcane Rate Raju Shetty: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ठाम आहेत.

Sugarcane Rate Raju Shetty: अहिल्यानगर : ऊसदराचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) ठाम आहेत. शेतकऱ्यांना पहिली उचल 3,700 रुपये द्यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय ऊसतोडीनंतर 100 रुपये आणि साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर आणखी 200 रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. चर्चेतून मार्ग निघाला नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 28 तारखेपासून आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कारखानदारांची बैठक सुरू असून, त्यातून काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.

डिलिमिटेशनवर भाजपच्या अडचणीत वाढ ; DMK ची भूमिका स्पष्ट, काय आहेत डीएमकेच्या मागण्या?

नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी दर का स्वीकारायचा?

ऊसदराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात चर्चेची पहिली फेरी पार पडली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने ऊसदराचा तिढा कायम आहे. या बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, अभिजित पोटे, तोरडकर तात्या यांच्यासह शेतकरी आणि कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेजारच्या जिल्ह्यांमध्ये 3,500 ते 3,900 रुपये पहिली उचल दिली जात आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात 4,200 रुपये ऊसदर मिळत आहे. मग नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी दर का स्वीकारायचा? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदरातील ही तफावत दूर करावी. अन्यथा ऊस पळवापळवीचे प्रकार वाढतील आणि त्याचा फटका शेतकरी तसेच कारखानदारीलाही बसेल, असा इशारा त्यांनी दिला.

बीडमध्ये उभारणार सिल्क साडी उद्योग! 10 वर्षांत ‘सिल्क बीड’ म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचा जिल्हाधिकार्यांचा संकल्प

कारखानदारांनी हा दर देण्यास टाळाटाळ करू नये

नगर जिल्ह्यातील साखर उतारा क्षमता सोलापूरपेक्षा अधिक असल्याचा दावा करत शेट्टी म्हणाले की, 341 रुपये प्रतिटक्का रिकव्हरीच्या हिशेबाने 11 टक्के रिकव्हरीसाठी 3,751 रुपये दर होतो. मात्र, आम्ही 3,751 रुपयांची मागणी न करता केवळ 3,700 रुपये मागत आहोत. त्यामुळे कारखानदारांनी हा दर देण्यास टाळाटाळ करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन चार हजार रुपयांवरून साडेचार हजार रुपये करावे. मूल्यांकन वाढल्यास कारखान्यांना आर्थिक आधार मिळेल आणि ऊसदराचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारी टिकली पाहिजे आणि कारखाने किमान 120 दिवस चालले पाहिजेत, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, कारखानदारीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाकारता येणार नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

मोहिते-पाटलांचा स्वाभिमान भीमा नदीत टाकला, पराभवाची सवय लागलीय; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

बैठकीत तोडगा नाही; आता दुसऱ्या फेरीकडे लक्ष

पहिल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता दुसऱ्या बैठकीत तरी कारखानदार आणि प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, 3,700 रुपयांच्या पहिल्या उचलीच्या मागणीवर कोणतीही तडजोड करणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version