Download App

बनावट ‘रॉ’ अधिकाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर : भारतीय सैन्य दलात इन्टेलिजेन्स विभागातील (रॉ) अधिकारी असल्याचे भासविणारा तोतया सैन्य अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा व पुण्यातील सदन कमान मिलेट्री इन्टेलिजेन्स विभाग यांच्या पथकांनी जेरबंद केला. संतोष आत्माराम राठोड (वय 35, रा. दिवटे, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, सावेडीतील समर्थ शाळेजवळ एक ‘रॉ’चा तोतया अधिकारी आला आहे. नगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर ही सैन्यदलासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. यात कोणी तोतया सैन्य अधिकारी आढळणे ही गंभीर बाब आहे.

Patna Meeting : बैठकीनंतर विरोधकांचं पुढचं पाऊल काय? नितीश कुमारांनी सांगून टाकलं…

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आहेर यांनी पुण्यातील सदन कमान मिलेट्री इन्टेलिजेन्स विभागाला कळविले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सदन कमान मिलेट्री इन्टेलिजेन्सचे पथक यांनी समर्थ शाळेजवळ सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडे बनावट ओळखपत्र, शासकीय चिन्ह व कागदपत्रे आढळून आली.

पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…

सैन्य विभागाने आरोपीची चौकशी केली असता, तो सैन्य दलात नोकरीला नसल्याचे आढळून आले. पथकाने आरोपीला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस नाईक सचिन अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बनावट शासकीय कागदपत्रे तयार करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us