Download App

Ahmednagar : संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा; फडणवीसांनी लक्ष घालताच गुन्हा दाखल…

Ahmednagar News : मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा (Aurangzeb Photo) हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. (Ahmednagar Crime against those who dance with the image of Aurangzeb)

फकिरवाडा परिसरात असलेल्या हजरत दम्मा हरी दर्ग्यात सालाबादाप्रमाणे उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. चादर अर्पण करण्यासाठी मुकुंदनगर भागातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. मिरवणुकीदरम्यान, शक्ती प्रदर्शन करुन “बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है” अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यावर राष्ट्रवादीचा डोळा! काँग्रेसच्या बैठकीत घमासान, पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

औरंगजेबाची प्रतिमा घेऊन नाचत असल्याचा तरुणांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड भाष्य केलं आहे.

नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगरमध्ये मंदिरात ड्रेसकाेड; बर्मुडाधारी, हाफ पॅन्ट भाविकांना नाे एन्ट्री

फडणवीस म्हणाले, औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

त्यानंतर तत्काळ अहमदनगर पोलिस दलाने व्हिडिओची दखल घेत तपासाची चक्रे फिरवली. अखेर या प्रकरणी चार तरुणांवर पोलसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार रा. दर्गादायरा, अफनान आदिल शेख उर्फ खडा, रा.वाबळे कॉलनी, शेख सरवर रा. झेंडीगेट, जावेद शेख उर्फ गब्बर रा. आशा टॉकीज या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us