Ahmednagar News: राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असतान नुकतेच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. (Ahmednagar Crime) पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे (Yuvraj Pathare) यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेच्या निषेधार्थ पारनेर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. (Ahmednagar Police) यावेळी घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करावी, बसस्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविणे, टुकारखोरांवर कारवाई करणे या मागण्या करण्यात आल्या. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडले होते? पारनेर शहरातील बस स्थानकासमोरील नगरसेवक युवराज पठारे हे आपले कार्यकर्ते व मित्रासोबत बसले असताना रांजणगाव मशीद येथील यश बाळासाहेब जाधव याने नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा रोखून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु गावठी कट्टयातून सुटलेली गोळी कट्यातच अडकल्याने नगरसेवक युवराज पठारे हे बचावले. या वेळी भरत गट यांच्यासह कार्यकर्त्यांनी हल्लेखोर यश जाधव याच्याकडून गावठी पिस्तूल हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टाळला गेला. कार्यकत्यांनी हल्लेखोर जाधव यास चोप देऊन पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
पारनेर कडकडीत बंद: पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेच्या निषेधार्थ पारनेर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. तसेच बसस्थानक परिसरात टवाळखोर करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली त्यावेळी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
दरम्यान गोळीबार प्रकरणी पोलीस प्रशासनाने दोघांना अटक केली आहे. तसेच या घटनेतील इतर आरोपीना देखील तातडीने अटक केली जाईल असे आश्वसन देखील यावेळी पोलीस प्रशासनाने दिले आहे. तसेच गुन्हेगारीला आला घातला जाईल व अशा घटना घडणार नाही याबाबत आम्ही देखील सतर्क राहू असे देखील यावेळी पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.