Download App

अजितदादा सत्तेत! उदयनराजेंनी मनभेद विसरुन केलं अभिनंदन…

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मागील काळात झालेले मनभेद विसरुन उदयनराजेंनी अजित पवारांच्या अभिनंदन केल्याने उदयनराजेंच्या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे. एवढंच नाहीतर आपण प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा देणार असल्याचंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

IND vs SA Schedule: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर, वाचा कधी आणि कुठे होणार सामने

साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनी योजनेचं उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झालं. या नव्या जलवाहिनी योजनेद्वारे कास धरणातून शहरापर्यंत जवळपास 29 किमी लांबीहुन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, दिलीप छिद्रे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आदी उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.

Ajmer 92 Teaser Out: मनाचा थरकाप उडवणारा ‘अजमेर 92’ चा टिझर प्रदर्शित

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्याबद्दल त्यांना माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर त्यांनी आमचा फोन झाल्याचं सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या अजित पवारांची धावपळ सुरु आहे. सर्व काही विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटून चर्चा करु, असं त्यांनी सांगितल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलं. त्यानुसार मी त्यांची भेट घेणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे.

दरम्यान, अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेत सर्वांनाच माहित आहे. आता उदयनराजे आणि पवार भेट झाल्यानंतर ते काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us