IND vs SA Schedule: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर, वाचा कधी आणि कुठे होणार सामने ?
IND vs SA Schedule: भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे, जिथे संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर 3 वनडे आणि नंतर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल.( India’s tour of South Africa announced, read when and where the matches will be played)
भारतात खेळल्या जाणार्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला डर्बनमध्ये तर दुसरा सामना 12 डिसेंबरला कुबेरामध्ये खेळणार आहे. मालिकेतील शेवटचा टी-20 सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवला जाईल.
BCCI and @ProteasMenCSA announce fixtures for India’s Tour of South Africa 2023-24.
For more details – https://t.co/PU1LPAz49I #SAvIND
A look at the fixtures below 👇👇 pic.twitter.com/ubtB4CxXYX
— BCCI (@BCCI) July 14, 2023
17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून, या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबर रोजी क्युबेरा येथे खेळवला जाईल, तर मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी पर्ल ग्राउंडवर खेळवला जाईल.
यशस्वीसमोर वेस्टइंडिज ‘अयशस्वी’, दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाची सामन्यावर पकड मजबूत
बॉक्सिंग-डे कसोटी सामना सेंच्युरियन मैदानावर खेळवला जाईल
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या चक्रात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत परदेशात दुसरी कसोटी मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डेच्या दिवशी सेंच्युरियन मैदानावर सुरू होईल. त्याचवेळी, या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2024 च्या सुरुवातीला केपटाऊन मैदानावर 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. यापूर्वी, 2021-22 मध्ये भारतीय संघाने शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता तेव्हा त्यांना 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.