Download App

सरकारकडून आदेश आला, हे सिद्ध करुन दाखवा; अजितदादांचं विरोधकांना चॅलेंज

Ajit Pawar On MVA : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राडा झाला. त्यावेळी पोलिसांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर लाठीमार करण्यात आल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे, त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुन आदेश आल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं विरोधकांना थेट चॅलेंज दिलं आहे.

Jalna Maratha Protest : लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगूनच टाकलं…

मराठा आरक्षण उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनीही घणाघाती टीका केली.

Jalna Maratha Protest : मावळ, गोवारी गोळीबाराचे आदेश कुणी दिले? फडणवीसांचा विरोधकांना सवाल

यावेळी अजित पवार म्हणाले की, काही जणांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काहीजण खुशाल सांगतात की, वरुन आदेश आले. मी आपल्याला सांगतो की, वरुन आदेश आल्याचे सिद्ध करुन दाखवलं तर आम्ही म्हणेल ते ऐकू.

कारण नसताना शंका निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. गैरसमज, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Tags

follow us