Malegaon Cooperative Sugar Factory : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून शरसंधान होत असतानाच उपमुख्यमंत्री दर्जाची व्यक्ती कारखान्यामध्ये उमेदवारी अर्ज भरते, अशा प्रकारची टीका झाल्यानंतर शनिवारी अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक साधला आहे. (Sugar )दरम्यान, चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून प्रहार करताना, यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? अशी विचारणा केली आहे.
अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही? अजित पवारांचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना ते दर का देत नाहीत? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १३ जूनला आपण चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यापूर्वीच केली होती. खरोखरच अजित पवार यांनी आपणच चेअरमन होणार असल्याचे सांगितले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील पुढले अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार असतील याची घोषणा स्वतः त्यांनीच केली.
मावळमधील इंद्रायणीवरील पूल कोसळला; वाहून गेलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त
अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात अत्यंत आक्रमकपणे केली होती. अजित पवारांनी एक वेगळेच भाषण केले. त्यांनी पहिल्या शब्दापासूनच अत्यंत आक्रमकपणे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य केले. मी ‘ब’ वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून स्वतः अर्ज भरला असून मी स्वतःच कारखान्याचा पुढील अध्यक्षा असेल असे त्यांनी जाहीर केले आणि सभेचा नूर बदलला उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार जर ते माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष झाले तर अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीतील ते सहकारी साखर कारखान्याचे पहिले अध्यक्ष असतील यापूर्वी त्यांनी जिल्हा बँक राज्य सहकारी बँक तसेच विविध संस्थांवर आणि संघटनावर अध्यक्ष पद भूषवले आहे आता अजित पवार स्वतः चेअरमन होणार असल्याने एक वेगळीच घटना या निमित्ताने राजकारणात पाहायला मिळणार आहे.