माळेगाव कारखान्याचे कारभारी अजितदादा! 21 पैकी 20 जागा जिंकल्या, शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ

Malegaon Sugar Factory Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Cooperative Sugar Factory) चुरशीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कारखान्यावर वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकल्या. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनलचा सुपडा साफ झाला.
वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात कपात होणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा
नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकल्या…
अजितदादांनी ब वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून चेअरमनपदासाठी आपले नाव जाहीर केले होते. त्यामुळे या निवडणुकीला मोठं महत्व प्राप्त झालं होतं. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान झाले. अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलला चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलने चांगलीच झुंज दिली. दरम्यान, आज निकाल जाहीर झाला असून नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकल्या.
तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव विजयी उमेदवार म्हणून समोर आले आहेत. सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले. विरोधी गटातून विजयी होणारे ते एकमेव उमेदवार ठरले. त्यांनी अजित पवारांच्या पॅनलच्या वीरेंद्र तावरे यांचा पराभव केला.
‘गाडी नंबर 1760’ मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स
दुसरीकडे, शरद पवार-युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचा सुपडा साफ झाला. त्यांच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
दरम्यान, निकालानंतर सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली. हा जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय असल्याचा आरोप त्यांनी केला.
नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
ब श्रेणी
१) अजित पवार
भटकंती विमुक्त राखीव
२) विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
३) रतनकुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
४) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
५) संगीता कोकरे
६) ज्योती मुलमुले
मालेगाव गट : ०१
7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : २
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : ०१
13) चंद्रराव तावरे
14) गणपत खलाटे
15) विजय तावरे
शिरवली गट
16) प्रताप आटोळे
17) सतीश फाळके
बारामती गट
18) नितीन सातव
19) देविदास गावडे
नीरावागज गट
20) जयपाल देवकाते
२१) अविनाश देवकाते