Download App

आम्ही काय इकडं गोट्या खेळायला आलोय? पुरग्रस्तांच्या प्रश्नावर संतापलेल्या अजित पवारांनी ओढली पुतण्याची री

Ajit Pawar यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. त्यावेळी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारताच ते संतापले. त्यांनी रोहित पवारांची री ओढली.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar angry on question about flood victims as like Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना एका गावकऱ्याने कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार त्याच्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं. त्यावर उत्तर देताना त्यांनी संतापून उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांनी पुतणे रोहित पवारांची री ओढल्याचं पाहायला मिळालं.

 Asia Cup 2025 : भारतासोबत फायनलमध्ये कोण भिडणार? आज होणार निर्णय

काय म्हणाले अजित पवार?

ओल्या दुष्काळी भागाची पाहणी करताना अजित पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका गावकऱ्याने त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार त्याच्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं. त्यावर उत्तर देताना त्यांनी संतापून उत्तर दिलं. ते म्हणाले की, यालाच द्या मुख्यमंत्रीपद. आम्हालाही कळतंय ना. आम्ही काय इकडं गोट्या खेळायला आलोय? आम्ही सकाळी सहापासून करमाळ्यामध्ये होतो. जे काम करत ना त्याचीच मारा. एवढं जीवतोडून सांगतोय. आणखी एका ठिकाणी जायचयं, आम्हालाही कळतं ना. असं म्हणत त्यांनी देखील रोहित पवारांप्रमाणेच गोट्या खेळायला आलोय का? असं म्हणत प्रतिउत्तर दिलं.

गडकरींचा पापाचा घडा भरला! अंजली दमानियांचा आरोपांचा भडिमार, भांडूपच्या घरांपासून कोट्यवधींच्या कंपन्यांपर्यंत…

काय म्हणाले होते रोहित पवार?

दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील एका कार्यक्रमामध्ये कामावरून एका अधिकाऱ्याला झापले होते. त्यावेळी देखील त्यांनी त्या अधिकाऱ्याला इतके दिवस गोट्या खेळत होता का असे विचारले होते. त्यानंतर आता अजित पवारांनी देखील तीच री ओढली आहे.

 

 

 

follow us