इंदापूर : अजित पवार म्हटलं की समोर येत स्पष्ट बोलणारं आणि नेहमी कडक कपडे आणि डोळ्यांवर गॉगल असलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या विधानाची बोलण्याच्या स्टाईलची आणि राहणीमानाची नेहमीच चर्चा होते. पण इंदापुरच्या सभेत अजितदादांनी त्यांच्या याच स्टईलबद्दलचं एक मोठं गुपित उघड केलं आहे. सभेत बोलताना अजित पवारांनी मी शायनिंग मारायला नव्हे तर, मोलाच्या सल्ल्यानुसार नेहमी गॉगल वापरत असल्याचा सांगितले आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांवही जोरदार हल्लाबोल केला.
…तर पवारसाहेब 84 वर्षे जगले नसते; अस्वस्थतेवरून राणेंचा खोचक टोला….
पवारांना कधी सोडलं नाही
माझा स्वभाव पाहिल्यावर मला कधी वाटले नव्हते की, मी राजकारणात येईल. कारण मी एक घाव दोन तुकडे करत असतो. आता काहीजण म्हणतात की, या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होते. परंतु मी साहेबांना कधी सोडले नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
वसंतदादांचं उदाहरण देत अजितदादांनी सांगितला पराभवाचा इतिहास
आमचे सगळे कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचे होतं. आमचे थोरले काका वसंतदादा पवार पोट निवडणुकीला उभे होते त्यावेळी पवारसाहेब विद्यार्थी होते मात्र पूर्ण कुटुंब वसंतदादा पवारांच्या पाठीमागे असताना त्यांनी दादांना विरोध केला. त्यामुळे ही सुरुवात काही नवीन नाही. तसेच 2004 ला देखील राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र साहेबांनी ती नाकारली. त्यामुळे असं वाटतं की, आता केलं ते 2004 ला केला असतं तर बरं झालं असतं.
…म्हणून गॉगल वापरतो
सभेत राजकीय भाष्य करत हल्लाबोल केल्यानंतर अजित पवारांनी ते वापरत असलेल्या गॉगलवर भाष्य केले. ते म्हणाले की, ”माझ्या डोळ्याच्या रेटिनाचे ऑपरेशन झाले आहे. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला गॉगल वापरावा लागत आहे. नाहीतर म्हणाल, हा शायनिंग मारायला लागला आहे,” असे स्पष्टीकरण यावेळी अजित पवारांनी दिले.