Ajit Pawar on Sharad Pawar Meeting : शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील साखर संकुलात आयोजित तांत्रिक विषयावरील बैठकीच्या निमित्ताने (Sharad Pawar) दोघेही एकत्र आले होते. या बैठकीत अजित पवारांना शरद पवारांसोब झालेल्या बैठकीबाबत विचारलं असता त्यांनी प्रश्नाला बगल दिली.
तुम्ही गेल्या काही दिवसांता अनेक दा भेटलात असं विचारलं असता ते अजित पवार म्हणाले, मागं कुटुंबाचा एक सोहळा झाला त्यामध्ये आम्ही एकत्र आलो. पुन्हा रयतमध्ये भेटलो. आता तिथ रयतशी संबंधीत असल्याने आम्ही जातो. त्यामुळे यामध्ये कोणतंही राजकारण आणत नाही. यामध्ये फक्त विकासाची काम असल्याने आम्हाला जाव लागत. राजकारणासारख यात काही नाही असं म्हणत मुख्य प्रश्नाला अजित पवारांनी बगल दिल्याचं पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या एकीकरणाला कुणाचा विरोध; पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या प्रतिक्रिया काय?
आम्ही जनतेला काही शब्द दिल्याने बांधील आहोत. त्यामुळे आम्हाला सोबत यावं लागतं. काम करावं लागतं. सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण आणणं योग्य नाही. केंद्र सरकारच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही सत्तेत आहोत आता आम्हाला भेटी-गाठी घेऊन काम करावे लागतात असंही अजित पवार म्हणाले.