Sanjay Raut on Ajit Pawar Irrigation scam Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Sanjay Raut ) काल प्रचार सभेत बोलताना दिवंगत आर आर पाटील यांचा उल्लेख करत सिंचन घोटाळा प्रकरणावर भाष्य केलं. त्यानंतर या त्यांच्या वक्तव्यावर अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा शब्दांत संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे.
आबांचे केस फार लहान होते ते केसांनी गळा कापू शकत नाहीत. ते अत्यंत कर्तबगार असे राज्याचे गृहमंत्री होते. गृहमंत्री म्हणून त्यांनी कधी चुकीचं काम केलं असंही आम्हाला वाटत नाही. अजित पवारांनी काल आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
अजित पवारांकडून सिंचन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली A टू Z कहाणी
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेची जी शपथ घेतली आहे, त्या व्यक्तीने अशा पद्धतीने गोपनीयतेचा भंग करणे हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजेत. तुम्ही जनतेसमोर या गोष्टी कशा काय दाखवू शकता? अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले आहेत अजित पवार?
माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर ७० कोटींचा आरोप करूया असं ठरवलं. त्यावेळी एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे गेली. त्यावर आर आर पाटलांनी अजित पवारांची चौकशी करावी यासाठी सही केली. म्हणजे हेतर केसाने गळा कापण्याचे काम आहे, असं अजित पवारांनी काल एका सभेत म्हटलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या वक्तव्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अस ते म्हणालेत.#AjitPawar #DevendraFadnavis #sanjayraut pic.twitter.com/qsrTKfmrkB
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 30, 2024