Download App

उपटसुंभ लोकांवर मी उत्तर देणार नाही, अजित पवार संतापले

  • Written By: Last Updated:

मुंबई : बारामतीचे पवार चुलते पुतणे म्हणजे चोरट्यांची टोळी आहे. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे’, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या प्रश्नावर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले.

अजित पवार म्हणाले, ‘तो कोण कुठला उपटसुंभ, त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय रिकामा आहे काय? माझ्याकडे खूप काम आहे, अशा शब्दात त्यांनी पडळकरांवर हल्ला चढवला तर जनमाणसात ज्यांची प्रतिमा आहे, अशा लोकांवर तुम्ही प्रश्न विचारत चला, असा सल्ला अजितदादांनी माध्यम प्रतिनिधींना दिला.

कृषी प्रदर्शनावरुन पडळकर यांनी पवारांना लक्ष्य केलं होतं. यावर अजितदादा म्हणाले, तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचारताय तो काय एवढा मोठा नेता नाहीये. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय…” अशा शब्दात अजितदादांनी टीकास्त्र डागलं.

“कृषी प्रदर्शनात शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितले, असा गंभीर आरोप पडळकरांनी पवार यांच्यावर केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी पडळकरांना थेट चॅलेंजच दिलं. ज्या कोणत्या माणसांना पवार साहेबांनी पैसे मागितले, त्यांना समोर उभं करा, मी राजकारण सोडून देतो… आहे का त्याची हिम्मत राजकारण सोडण्याची…”, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींनी देखील जनमाणसात ज्याची प्रतिमा आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारावे. आम्ही त्यांच्याबद्दल नक्की उत्तरं देऊ, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

Tags

follow us