पुणे : लावणीच्या नावाखाली अश्लिलपणा होता कामा नये, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलीय. सध्या महाराष्ट्रात साततत्याने नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami patil) अश्लिल नृत्य करत असल्याचा आरोप होत आहे, त्यावरुन अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
हेही वाचा : Bollywood movie : ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ च्या निमित्त श्रिया सरनने व्यक्त केल्या भावना…
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये.
हेही वाचा :“यह कह-कहकर हम दिलको..”, ‘ये हुई ना बात’ म्हणणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी सुनावलं
राज्यातील काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडणार असल्याचं अजित पवारांनी म्हंटलंय. अवघ्या कमी कालावधीत चर्चेत आलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलला राज्यातील अनेक नेत्यांकडून कार्यक्रमाला बोलवले जाते. यावेळी कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलकडून अश्लिल नृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी गौतमीच्या अश्लिल नृत्याप्रकरणी ताशेरे ओढले होते. त्यावेळी गौतमी पाटीलने माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याची ग्वाही देखील दिली होती. त्यानंतर गौतमी पाटीलला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली होती. अश्लिल नृत्य न करताही गौतमी पाटीलवर अनेक कलावंतांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं समोर आलं होतं.
काही दिवसांपूर्वीच सांगली इथं झालेल्या गौतमी पाटील कार्यक्रमात तरुणांनी गोंधळ घालत शाळेच्या छतासह झाडांवर चढून कार्यक्रम बघत असल्याचं निदर्शनास आलं होतं. सांगलीच्या कार्यक्रमात एका वृध्दाचा मृत्यू झाला होता. तेव्हा देखील गौतमी पाटीलवर अनेक टीका झाल्या होत्या. अखेर जेवढा विरोध तेवढी प्रसिध्दी मिळवत गौतमी पाटीलने महाराष्ट्रात आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. या कार्यक्रमांनंतर गौतमी पाटीलला आता चित्रपटांसह वेब सिरीजमध्येही संधी मिळाल्याचं समोर आलंय.
दरम्यान, सातत्याने चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलला राजकीय नेते वाढदिवसासह इतर कार्यक्रमांना बोलावत असतात. यामध्ये विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यक्रमाला बोलावल्याने अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना इशारा देण्यात आला आहे.