“यह कह-कहकर हम दिलको..”, ‘ये हुई ना बात’ म्हणणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी सुनावलं
नवी दिल्ली : “यह कह-कहकर हम..दिलको बेहला रहे है, वो अब चल चुके है वो अब आ रहे है” या शेरोशायरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं आहे. तसेच काही लोकांच्या भाषणातून आम्हांला त्यांचे मनसुबे, योग्यता आणि क्षमता समजत आहे, त्यावर चर्चा होणार आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदीय भाषणात विरोधकांचा समाचार घेतला आहे. काल राहुल गांधींनी (Rahul Gandhi) उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणावरुन पंतप्रधानांवर हल्लाबोल चढवला होता. त्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता चांगलाच समाचार घेतलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही लोकांनी काल भाषण केलं, त्यावेळी अनेकांमध्ये उत्साह असल्याचं आम्हांला पाहायला मिळालंय. त्यावेळी काही लोकं आनंदाने म्हणत होते की, ये ‘हुई ना बात’. मी काल भाषण पाहत असताना असं लक्षात आलं की, भाषणादरम्यान समर्थकांचा उत्साह गगनात मावत नव्हता. समर्थक त्यावेळी अत्यंत खुश असल्याचं आम्हांला पाहायला मिळालं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Prime Minister नरेंद्र मोदींची टीका ; ‘आपला देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था…
दरम्यान, मोदी म्हणाले, अशा लोकांसाठी असं म्हंटलं गेलंय की, “यह कह-कहकर हम..दिलको बेहला रहे है, वो अब चल चुके है वो अब आ रहे है” या शेरोशायरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं आहे. तसेच समर्थकांकडून राष्ट्रपतींच्या भाषणावेळी संसदेतले अनेक नेते बाहेर गेले होते. एका मोठ्या नेत्याकडून तर देशाचे महामहिम राष्ट्रपती मुर्मू यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
आपला देश आता भ्रष्टाचारमुक्त होत आहे, भारतातली स्थिरता पाहुन अनेक मोठ-मोठे देश भारताकडे आशेने पाहत आहेत. आपल्या देशाच्या आजुबाजूचे देश अर्थिक संकटात असून संपूर्ण देशाला आता भारताविषयी आशेचं वातावरण तयार झाल्याचंही ते म्हणाले आहेत.
आपल्या देशाच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता सरकारमध्ये असून जेव्हा महामहिम राष्ट्रपती मुर्मू भाषण करत होते तेव्हा अनेकजण त्यांचे भाषण शांततेत ऐकत होते. काल अनेकांनी जोरदार भाषण केलं खरं पण आम्ही जेव्हा अशा गोष्टी टिव्हीवर पाहिल्या तेव्हा खरं काय आहे ते समोर येणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाषणानंतर आम्हांला चिठ्ठी लिहुन वाचण्याचा प्रयत्न केला असल्याचा गौप्यस्फोटही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काल काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आज काय बोलणार? याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं.
अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील या शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचंही नाव न घेता आपल्या संसदीय भाषणादरम्यान विरोधकांचा शेलक्या शब्दांत शायरी करुन समाचार घेतल्याचं पाहायला मिळालंय.