Download App

शिंदे गटाचा विरोध डावलून भाजप राज्याच्या तिजोरीची चावी दादांकडेच देणार, खाते वाटपाचा तिढा सुटणार?

  • Written By: Last Updated:

राज्यात अजित पवार यांच्यासह त्यांच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर अद्यापही खात्यांचे वाटप झालेले नाही. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळाचे वातावरण आहे. आता अजित पवारांना अर्थमंत्रालय दिले जाऊ शकते. अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यानंतर आता औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. गेल्या आठवडाभरापासून या विभागाबाबत सातत्याने बैठका सुरू होत्या. Ajit Pawar May Get Finance Ministry  In Eknath Shinde Cabinet After Meeting With Amit Shah)

अमित शहा यांची दिल्लीत भेट

राज्यातील खात्यांच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुढील कायदेशीर लढाईवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हरीश साळवे शिवसेनेच्या शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटाचा खटला लढवू शकतात.

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

महाविकासआघाडी सरकारच्या काळात अर्थ खात हे अजित पवारांकडे होत. अर्थ खात अजित पवारांकडे असल्याकारणाने शिंदे व त्यांच्या आमदारांना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप या आमदारांनी केला होता. म्हणूनच शिंदे आपल्या चाळीस आमदारसोबत सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्री झाले. म्हणून शिंदे गटाचे आमदार अजित पवार यांना अर्थ खात देण्याचा विरोध करत आहेत .

आता पुन्हा अजित पवार देखील आपल्या पक्षात बंड करून भाजपसोबत येत सरकारमध्ये सामील झाले आहेत. काही दिवसापासून रखडलेले खाते आता मार्गी लागणार असल्याचे बॉईलले जाते. पुन्हा अर्थ खात हे अजित पवारांकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे कि अजित पवारांना अर्थ खात मिळाल्यावर शिंदे आणोनि त्यांच्या आमदारांची काय भूमिका असणार आहे

Tags

follow us