Ajit Pawar meeting canceled in ST agitation Dissatisfaction employees intensity of agitation increase : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमा मिळाव्यात यासाठी एसटीमधील वेगवेगळ्या आठरा संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून प्रश्न आर्थिक स्वरूपाचे असल्याने अर्थ मंत्री व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या सोमवारी बैठक आयोजित केली होती. पण राजकीय कारणामुळे ही बैठक अचानक रद्द करण्यात आली असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे यातून नक्की मार्ग काढतील व आंदोलन टळेल असे विश्वास महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे.
‘सैयारा’ खरं तर इंडस्ट्रीचा विजय! मोहित सूरी-वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी यांचे मत
एसटी कामगार संघटना कृती समिती सह अन्य दोन संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून त्यातील पहिले आंदोलन हे १३ तारीख रोजी म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग निघणे गरजेचे असून मंत्री प्रताप सरनाईक ही आता एकच आशा शिल्लक आहे.व तेच एसटीचे अध्यक्ष असून आमचे कुटुंब प्रमुख आहेत.यातून त्यांनीच काही मार्ग काढावा अशी विनंतीही बरगे यांनी केली आहे.
काय आहेत मागण्या!
2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत.थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.