Ajit Pawar on Farmer Melava : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पिंपरखेड आणि इतर गावातील शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. शेतकरी म्हणाले दादा आम्ही पीकविमा काढला. आमच्या शेतातील पिकांचे ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. पण आम्हाला पिकविम्याचे केवळ २०० आणि ४०० रुपये इतकीच मदत दिली. २००-४०० रुपयांत आमची नुकसान कसे भरून निघणार आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत आहे. त्यांनी पीकविमा काढला होता. पण तुटपुंजी मदत देऊन बोळवण केली. या खोके बहाद्दर आणि अनैसर्गिक सरकारची शेतकऱ्यांना मदत करायची दानत नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके गेली. आमचा शेतकरी नाडतो तेव्हा त्याला मदत करायची सरकारची दानत नाही. पीकविमा बाबत तर शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली जात आहे. सत्ताधारी पक्षाला सत्तेची मस्ती अली आहे, असा आरोप अजित पवार यांनी राज्य सरकारवर केला.
राज्य आणि केंद्र सरकार हे मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. केवळ मूठभर उद्योगपतीसाठी ते काम करत आहे. त्यांना या देशातील शेतकऱ्यांचे काहीही देणंघेणं पडलेले नाही. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एवढं नक्की सांगतो. तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.
(245) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube