Ajit Pawar यांची केंद्रांवर टीका : मूठभर उद्योगपतींचे ११ लाख कोटी माफ केले… पण शेतकऱ्यांना मदत नाही केली!

Ajit Pawar यांची केंद्रांवर टीका : मूठभर उद्योगपतींचे ११ लाख कोटी माफ केले… पण शेतकऱ्यांना मदत नाही केली!

Ajit Pawar on Farmer Melava : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री मंत्री होते तेव्हा गारपीट, अवकाळी येऊद्या की अन्य कोणतेही संकट असो. शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यायचे. मात्र, केंद्र सरकारने देशातील काही मूठभर उद्योगपतींचे तब्बल ११ लाख कोटी रुपये माफ केले. पण माझ्या बळीराजाचे, शेतकऱ्याला साधे दहा हजार कोटी रुपये माफ केले नाही. गेल्या काही दिवसांत राज्यातील शेतकरी गारपीट, अवकाळीने पुरता खचला आहे. पण, राज्य अथवा केंद्र सरकारने मदत केली नाही. केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मदत करायची दानतच नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

अजित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांत राज्यात गारपीट, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा, कांदा, सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे होते. मात्र, या शेतकऱ्यांकडे बघायला देखील राज्य सरकारला वेळ नाही.

Narayan Rane Vs Uddhav Thackeray : ठाकरे फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते… त्यांचा पक्ष संपला! – Letsupp

एका-एका उद्योगपतीचे ५० हजार कोटी, ५५ हजार कोटी, ७६ हजार कोटी रुपये असे गेल्या सात वर्षात ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण, या देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकडे पाहायला राज्य अथवा केंद्र सरकारला वेळ नाही. मूठभर उद्योगपतींचे लाखो कोटीं रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या केंद्र सरकारची दानतच नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला.

(245) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube

follow us
  • fb
  • instagram
  • youtube