Ajit Pawar यांचा सरकारवर हल्ला : मंत्र्यांच्या खाण्यापिण्यावर जनतेच्या पैशांची उधळपट्टी!

मुंबई : महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु आहे. सरकारची कामगिरी सुमार असल्याचे सांगत विधानसभेचे विरोधी […]

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis

शिंदेंना वगळून आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांची वर्णी; फडणवीसांचा दुसरा धक्का

मुंबई : महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु आहे. सरकारची कामगिरी सुमार असल्याचे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर आणि महाराष्ट्रविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला.

राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, गरीब जनतेशी सरकारला देणंघेणं राहिलेलं नाही. महिला आमदारांवर हल्ला होतो, सामान्य महिलांवर अत्याचार होतात. पण महिलांची सुरक्षा, कल्याणासंदर्भात सरकारकडे धोरण नाही. दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होत आहे. आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुध्द चौकशी करण्याची इच्छाशक्ती नाही. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्यांना मदतीचा हात देण्याची सरकारची तयारी नाही. कोरोनानंतर आर्थिक स्थिती रुळावर येत असताना मंत्री खाण्यापिण्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी करत आहेत, अशा प्रकारे राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे, असा घणाघात करत अजित पवार यांनी केला.

Rupali Chakankar : हिरकणी कक्ष कागदावर नको, महिला आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या

अजित पवार म्हणाले, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राज्यपालांच्या १६ पानांच्या आणि ७७ मुद्दे असलेल्या ३२ मिनिटांच्या अभिभाषणातून राज्याला काही दिशा मिळेल, राज्यासमोरील प्रश्नांबाबतच्या उपाययोजना समजून येतील, काही नवीन धोरणं राज्यापुढे मांडली जातील, अशी जनतेला अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. मराठी भाषा गौरव दिनी सभागृहात राज्यपालांनी किमान आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेत करायला हवी होती, मात्र ती केलेली नाही. भाषणातील एक वाक्यही ते मराठीतून बोलले नाहीत.

Exit mobile version