Download App

मृतांच्या कुटूंबियांना तातडीने मदत करावी, अजित पवारांची सरकारकडे मागणी

Ajit Pawar On Akola Paras Village Accident :  अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj temple) काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली  आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत व मृतांच्या कुटूंबियांना व जखमींना शासनाने तातडीने मदत जारी करावी, असे म्हटले आहे.

अकोल्यातील पारस येथे वादळी वाऱ्यात मंदिराच्या शेडवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला.ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.यात मृत्यू पावलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली! मृतांच्या कुटुंबियांना व जखमींना शासनानं तातडीनं मदत करावी, असे अजित पवारांनी म्हटेल आहे.

अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू

दरम्यान,या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यामुळंच लिंबांच मोठं झाड शेडवर कोसळलं. पाऊस रात्रभर सुरू असल्यानं मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मतकार्य सुरू होतं.

बीबीसी सरकारी अनुदानित मीडिया? ट्विटरच्या लेबलने चर्चांना उधाण

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनांच एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. यावेळी जेसीबाच्या मदतीनं मातिचा ढिगारा हटवण्याच काम करण्यात आलं. पावसामुळं झालेला चिखल, वादळी वारा, अंधार यामुळं बचावकार्यात अडथळा येत होतो. मात्र, बचाव पथकाने झाड हटवून लोकांना बाहेर काढण्यास सुरूवात करण्यात आली.

Tags

follow us