Ajit Pawar on Maharashtra Budget A to z Anouncement : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये लाडक्या बहिणींपासून राज्यातील सर्व घटक आणि क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी काय-काय घोषणा केल्या आहेत जाणून घेऊ सविस्तर…
चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार, मुद्रांक शुल्क वाढीचाही प्रस्ताव; अजित पवारांचा बजेटमधून झटका
महिलांसाठी केल्या मोठ्या घोषणा!
– दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट आहे.
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २३ हजार २३२ कोटी खर्च झाले आहेत. २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेत २०२५ -२६ मध्ये ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे.
– नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे. बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक “उमेद मॉल” उभारण्याचे शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
लाडक्या बहीणींना 2100 रुपयांची घोषणा नाहीच…अर्थसंकल्पात काय मिळालं?
विविध स्मारकांसाठी निधीची तरतूद…
– उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
– पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणी
– दोन टप्प्यातील काम पूर्ण, सरकार आणखी 50 कोटी देणार
– छत्रपती संभाजी महाराजांच्या खुणा जिथं आहेत त्याचा खूणा संगमेश्वर येथे आहेत.
– संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार
– वढू तुळापूर येथे स्मारकाचं काम वेगानं सुरु
– हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचं यथायोग्य स्मारक
– चैत्यभूमी दादर , इंदू मिल येथे स्मारकास निधी पुरवण्याचं काम
– अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारक
Video : संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा
– कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखणार. पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या दोन वर्षात त्यासाठी ५०0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
– नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
सर्वसामान्यांना मिळणार विविध फायदे…
– प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – 2 साठी राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.
– प्रधानमंत्री आवास योजना, शहरी- 1 साठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे.
– महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना मोठा दिला मिळालेला आहे. येत्या पाच वर्षामध्ये राज्यातील वीजदर कमी होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे.
– पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. नळ स्टॉर- वारजे असा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार. दुसऱ्या टप्प्यातील दोन मेट्रो मार्गांसाठी ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे. पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा ्प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय.
– अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. याशिवाय आदिवासी घटक कार्यक्रमाच्या यादीत ४० टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. धनगर, गोवारी समाजासाठी २२ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या.
– अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात वाहन कर, मुद्रांक शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करत जोरदार झटकाही दिला.
– औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार 20 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगाराच्या निर्मितीचं लक्ष असणार आहे.
3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करणार
यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
– सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने “नमामि गोदावरी” अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करुन त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे
– राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून दर्यापूर – जिल्हा अमरावती, पौड, इंदापूर व जुन्नर – जिल्हा पुणे, पैठण व गंगापूर -जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी – जिल्हा वर्धा, काटोल – जिल्हा नागपूर, वणी – जिल्हा यवतमाळ, तुळजापूर – जिल्हा धाराशीव तसेच हिंगोली येथील न्यायालयांचा समावेश त्यात आहे.
अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन!
– छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक खो-खो या राज्यस्तरीय स्पर्धांचं अनुदान प्रत्येकी 75 लाखावरुन 1 कोटी रुपये करणार.
– ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेत वाढ
– पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सुविधांच्या नुतनीकरणासाठी तरतुद
– क्रीडा संकुलांसाठीच्या देखभालीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनात 1 टक्का निधी राखीव ठेवणार