Download App

अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर होती, पण जयंत पाटलांनी सांगितले…

  • Written By: Last Updated:

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर होती. तशी पक्षाच्या वारिष्टयांची चर्चा देखील होती. दोन – तीन दिवसात यावर निर्णय देखील होणार होता. परंतु आता पक्षाला दुसरा विचार करावा लागेल असा इशारा पाटलांनी अजित पवारांना दिला. (
Ajit Pawar was offered the post of state president, but Jayant Patal said…)

दरम्यान, अजित पवार पक्षात नाराज असलेल्या चर्चांना काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर अजित पवारांनी आपल्याला संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. मात्र, त्यांनतर शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केलं होतं. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवार इच्छूक असल्याचं दिसून आलं होतं.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, काही दिवसांपासून एकनाथ शिंदे चांगलेच चर्चेत होते. शिंदे प्रचंड जोरात होते, एवढे की ठाण्यातही कोणाला भेटत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदेंविषयी लोकांमध्ये प्रचंड राग असेल, असं जयंत पाटलांनी सांगितलं.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

तसेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंड केलं तेव्हा सांगितलं होतं की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीमुळेच आमच्यावर अन्याय झाला होता. त्यामुळेच आम्ही भाजपशी युती करत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केल्याचं पाटलांनी सांगितलं.

पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने आणि विधानसभेच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने मी आपणाला ठामपणे सांगतो की, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे सर्व कार्यकर्ते तर फार मोठ्या संख्येने झालेल्या घटनेतून व्यथित झाले असून यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर देत असल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

Tags

follow us