‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

राज्यात घडलेल्या महाभूकंपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर मौन सोडलं आहे. जयंत पाटलांनी ट्विटरवर एक फोटो शेअऱ मी शरद पवारांसोबतच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. देवगिरीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी थेट राजभवन गाठून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. ही अप्रत्यक्ष घडामोड घडल्यानंतर शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आमची वेगळी भूमिका असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांची घुसमट होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर मी बॉंडवर लिहुन देतो की मी राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती.

अखेर अजित पवारांचा शरद पवारांना चकवा; दादांसह 40 आमदार ‘देवेंद्र’वासी

शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवली अन् कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात अजित पवारांनी मला विरोधी पक्षातून मुक्त करा आणि संघटनेत सामावून घ्या, असं स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी अजित पवारांची वर्णी लागणार असल्याचं भाकीत अनेकांकडून करण्यात आलं होतं.

UCC Issue: मेघालयच्या मुख्यमंत्र्याचा समान नागरी कायद्याला विरोध, म्हणाले… हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात

अखेर 6 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बदल करण्यात येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. तरीही अजित पवार आणि त्यांच्या सहकार्य़ांनी आज पक्षाविरोधात भूमिका घेत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकारणात महाभूकंपच झाल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

दरम्यान, जे झालं आहे त्याची मला काही चिंता नाही कारण दुसऱ्यांसाठी हे नवीन असेल पण माझ्यासाठी हे नवीन नसून उद्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर जाहीरपणे सभा घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हांडांची नियुक्ती केली आहे. आता उद्याच्या जाहीर सभेत शरद पवार काय बोलणार? फुटलेल्या सहकाऱ्यांवर कारवाई करणार का? राज्यातील राजकीय जाणकारांचं लक्ष आता शरद पवार यांच्या उद्याच्या भूमिकेकडेच लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube