प्रतिनिधी : प्रशांत गोडसे
Ajit Pawar : बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर संध्याकाळी नेमकी पाच वाजता मंत्रालयासमोरील A-4 बंगल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल होत असत. याच वेळी येथे नियमितपणे ‘जनता दरबार’ भरत असे. हा दरबार केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी खुले असलेले थेट दालन होते. जनता दरबारच्या दिवशी पक्ष कार्यालयात वेगळीच लगबग दिसून येत असे.
कार्यालयीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कॅन्टीन कर्मचारी आणि लिपिक वर्ग आधीपासूनच सज्ज असायचा. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पाणी, चहा मिळावा, बसण्याची योग्य व्यवस्था असावी, कोणालाही अडवणूक होऊ नये, याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या होते. “समोर आलेला माणूस कार्यकर्ता असो किंवा सामान्य नागरिक, त्याच्याशी माणुसकीने वागा,” असे ते नेहमी सांगत.
मंत्रालयासमोरील A-4 बंगला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालय आज शांत, ओस पडलेले दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मंगळवार, बुधवार आणि गुरुवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा जनता दरबार चालतो. सदर जनता दरबार पुढेही चालू राहील मात्र बुधवारी संध्याकाळी गजबजणारे हे कार्यालय आता आठवणींचे साक्षीदार बनेल. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी खुले असलेले हे दालन आता अजित पवार यांच्या जनता दरबाराशिवायच राहणार, अशी भावना कार्यकर्ते आणि कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्यानंतर फडणवीस सरकारमध्येही अजित पवार यांचा पक्षाचा जनता दरबार सातत्याने सुरू आहे. आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांची उणीव प्रकर्षाने भासणार, हे निश्चित आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी पार पडणारा जनता दरबारही भविष्यात दिसणार नाही.
Neil Bhatt : स्टार प्लसच्या ‘या’ मालिकेत दुहेरी भूमिका साकारणार अभिनेता नील भट्ट-
अजित पवार स्वतः घेत असलेला जनता दरबार आता इतिहासजमा झाला असून, त्यांच्या कार्यशैलीची प्रतिमा आणि जनतेशी असलेले थेट नाते या आठवणींच्या रूपाने कायम राहणार आहे.बारामती पॉवर म्हणजेच ‘पवार’ हे नावच जणू त्यांच्या कामातून साकारलेले व्यक्तिमत्त्व असेल.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दर बुधवारचा जनता दरबार थांबणार…….., बारामतीच्या अजितदादांना ही भावपूर्ण श्रद्धांजली.
