निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व

निकालांआधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला असून, त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

Untitled Design 2

Untitled Design 2

Ajit Pawar’s NCP dominates Pune district again : अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून सोमवारी, म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र निकालांआधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला असून, त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

प्राबच्या या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट बहुमतासह सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूण 73 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 47 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजप 18 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते. शिवसेनेच्या शिंदे गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता असून ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं. धक्कादायक बाब म्हणजे पुणे जिल्हा परिषदेतून काँग्रेस पूर्णपणे हद्दपार होण्याचा अंदाज या एक्झिट पोलनं व्यक्त केला आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना एका जागेवर यश मिळू शकतं.

दरम्यान, पंचायत समित्यांच्या निकालांचाही अंदाज प्राबच्या एक्झिट पोलमधून समोर आला आहे. एकूण 146 पंचायत समिती जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 96 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपला 26 जागा मिळू शकतात, तर शिवसेना शिंदे गटाला 17 जागांवर यश मिळू शकतं. शिवसेना ठाकरे गटाला 5 जागा मिळण्याचा अंदाज असून पंचायत समित्यांमध्येही काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचं या पोलनुसार स्पष्ट होत आहे. अन्य आणि अपक्ष उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळू शकतो.

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात अटक वॉरंट जारी

एकूणच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता प्राबच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली असून, अंतिम निकालांकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषद पक्षनिहाय आकडेवारी

– राष्ट्रवादी काँग्रेस – 47

– भाजप- 18

– शिवसेना शिंदे गट – 6

– शिवसेना ठाकरे गट – 1

– काँग्रेस – 0

– अपक्ष – 1

– एकूण – 73

पंचायत समिती पक्षनिहाय आकडेवारी

-राष्ट्रवादी काँग्रेस – 96

-भाजप – 26

-शिवसेना शिंदे गट – 17

-शिवसेना ठाकरे गट – 5

-काँग्रेस – 0

-अन्य व अपक्ष – 2

-एकूण जागा – 146

Exit mobile version