Download App

चहूबाजूंनी आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना अजितदादांकडून राष्ट्रवादीत ‘मानाचं पान’

Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) राज्याच्या

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील मागण्यात येत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठा निर्णय घेत धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये स्थान देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून कोअर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.

या कोअर ग्रुपचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहे. तसेत या ग्रुपमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील स्थान देण्यात आले आहे. याच बरोबर खा. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) , प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, आ. दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा या कोअर ग्रुपमध्ये समावेश असणार आहे.

आगामी निवडणुंकासाठी पक्षसंघटनेची बांधणी करणे, महत्वाच्या धोरणाची अखणी करणे याची जबाबदारी असणार आहे. तर दुसरीकडे सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘ओ बावरी’ प्रदर्शित

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त आरोपांवरून कुणावरही कारवाई केली जाणार नाही. सत्य समोर येईपर्यंत मुंडेंना पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल. अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

follow us