Deputy CM Ajit Pawar Funeral : राज्याच्या राजकारणात गेल्या साडे चार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या..आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या.. कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा.. ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाळ…स्वत:साठी राजकीय विद्यापीठ करून घेतानाच दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला निरोप दिला.
Ajit Pawar : राजकारणातलं ‘दादा’ नेतृत्त्व अनंतात विलीन; लेकांनी लाडक्या बाबांना दिला मुखाग्नी
Ajit Pawar यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Ajit Pawar : राजकारणातलं 'अजित' नेतृत्त्व अनंतात विलीन; लेकांनी लाडक्या बाबांना दिला मुखाग्नी