Akshay Kardile On Rahuri By Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Rahuri By Election) भाजपने (BJP) दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना अक्षय कर्डिले (Akshay Kardile) म्हणाले की, मला माझ्या आयुष्यामध्ये कधीच असं मनातही आलं नव्हतं की कधी असा प्रसंग माझ्या जीवनात येईल की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही माझ्या वडिलांशिवाय होईल. आज मोठी संधी आणि जबाबदारी मला मिळाली आहे, पण मला मात्र मोठं दुःख आहे की, हे सगळं मला मिळत असताना माझे वडील माझ्यासोबत नाही. यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट वाईट नाही. अनेक गोष्टी भविष्यामध्ये मला मिळतील, नाही मिळतील पण कायम माझ्या मनात दुःखच राहील की माझे वडील या प्रवासामध्ये माझ्या सोबत नाहीत.
आज खरं म्हणजे सर्वात जास्त मला त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांची मला बोलून सांगायची वाट पाहत होतो मी की, निवडणूक चालू झाली तुला उमेदवारी भेटली असं बोलणं आज मला त्यांच्याकडून अपेक्षित होतं, इच्छा होती पण आज त्या गोष्टी मनाला किती जरी वाटलं की अशा अपेक्षाच्या गोष्टी आहेत पण बुद्धीने माहिती की या गोष्टी होऊ शकत नाही. पण जे काही आज घडतय जे काही होतय हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. आज त्यांच्याच रूपाने मला खरं म्हणजे सर्व पक्षी श्रेष्टींनी विश्वास दाखवून ही संधी मिळाली आहे असं लेट्सअप मराठीशी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले.
पुढे बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, आज त्यांच्या मुळच जे काही आहे. मी हे सगळं काही माझ्या वडिलांमुळे आहे आणि जे काही मी भविष्यात करणार आहे हे फक्त आणि फक्त माझ्या वडिलांसाठीच मी करणार आहे असेही यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले.
तर साहेबांनी शून्यातून हे सर्व निर्माण केलेल आहे. आज प्रत्येक व्यक्ती मला भेटतोय प्रत्येक ठिकाणी एवढी मोठी जनता साहेबांसोबत आहे. एवढा मोठा परिवार साहेबांनी तयार केलाय. या परिवार तयार करण्यापाठीमागे साहेबांचे रात्रंदिवसाचे कष्ट आहेत. त्यांनी कुठेच वेळ न देता फक्त आणि फक्त वेळ हा सर्वसामान्य जनतेसाठी दिलंय. शरीराची झीज हुस्तर, रक्ताचं पाणी हुस्तर साहेबांनी काम केलं. म्हणून आज मी पाहतोय की पाच महिने झाले साहेब माझ्या सोबत नाहीत पण जनता साहेबांच्या रूपाने माझ्या सोबत यामुळे आहे.
साहेबांनी प्रत्येकासाठी काही ना काही गोष्ट केलेली आहे. प्रत्येकाशी संबंध साहेबांचा व्यक्तीश आहे आणि भावनिकतेने आज प्रत्येक व्यक्ती परिवार म्हणून ही जी जनता आपण पाहतो हा सगळा माझा परिवार आहे कारण की हा परिवार साहेबांनी जातानी माझी आणि या परिवाराची नाळ जोडून साहेब गेलेले आहेत म्हणून आयुष्यभर हा परिवार माझ्या सोबत असल्यामुळे मला साहेबांचा आशीर्वाद आणि हे सगळे लोक माझ्या सोबत असल्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की माझ्या सोबत सगळे राहतील.
विलीनीकरणबाबत चर्चा नाही कार्यकर्ते डिस्टर्ब होतात, तटकरेंच्या भूमिकेवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
आता ही निवडणूक नाव निवडणूक आहे, पण माझ्यासाठी निवडणूक नाही. जे काय आहे हे संपूर्ण माझ्या वडिलांसाठी त्यांच्या नावासाठी आहे. प्रत्येक व्यक्ती ही निवडणूकला सामोरे जात असतानी हेच पाहतोय की 30 वर्ष साहेब आमच्या सोबत होते आणि पुढचा येणारा काळ हा आम्हाला साहेबांच्या रूपात तुमच्यासोबत घालवायचा आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा ही निवडणूक भावनिकतेने करतोय. आज निवडणुकीला सामोरे जात असतानी कोण विरोधात उभा राहणारे? कोणाची कोणत्या प्रकारे तयारी आहे. कोणाचा फॉर्म येणार आहे? या सगळ्या गोष्टी आज माझ्यासाठी कुठल्याच महत्त्वाच्या नाहीत किंवा माझ्यासाठी सगळ्यांविषयी प्रेमच आहे मला कोणाचा रागही नाहीये किंवा कोणाच वाईटही वाटत नाहीये प्रत्येक व्यक्ती मला पाच महिन्यापासून साथ देतोय, धीर देतोय म्हणून या निवडणुकीला सामोरे जात असतानी माझ्यासाठी कुणीच विरोधक नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या वडिलांसाठी सगळं काही करतोय असं देखील अक्षय कर्डिले म्हणाले.
