Devendra Fadnavis : आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्सव सोहळा शिवनेरी येथे पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच 2030 मध्ये 400 वी शिवजयंती आपण भव्य दिव्य स्वरुपात साजरी करु अशी घोषणा देखील या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट केले आणि जगातील 27 देशांनी एकमताने मतदार करुन त्याला मान्यता दिली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की, अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं. मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करु. आता मला सांगताना आनंद वाटतोय की, अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रममुक्त झाले आहेत. एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण नाही असं या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. तसेच 2030 मध्ये 400 वी शिवजयंती आपण भव्य दिव्य स्वरुपात साजरी करु असं देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सुनेत्रा पवार भावूक
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या शासकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रमाणे कधीही शिव-शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सोडणार नसल्याचे आश्वासन दिले.
नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
यापूर्वी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजाचं दर्शन घेण्याची संधी आली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले- शाहू – आंबेडकर विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही हे तुम्हाला मी आश्वासन देते. याच ठिकाणी अजितदादांनी अनेकदा भाषण दिले आहे असं बोलताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या. अजितदादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण या शिवनेरी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यासाठई ते प्रयत्नशील होते असं देखील या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥LIVE|🚩दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
🕥 स. १०.३९ वा. | १९-२-२०२६📍पुणे.#ChhatrapatiShivajiMaharajJayanti https://t.co/xFIOPCaerc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2026
