Download App

रोज 20 लाख लोक टँकरची वाट पाहतात; मराठवाड्यातील पाणीटंचाई कधी संपणार? वाचा आकडेवारी

पावसाला सुरूवात झाली असली तरी मराठवाड्यात पाणी टंचाई कायम आहे. सुमारे २० लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Water Shortage In Marathwada : राज्यात पावसाला सुरूवात झाली असली तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई काही कमी होताना दिसत नाही. पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पाण्यासाठीची वणवण काही कमी होईना. (Marathwada) मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठली (Water Shortage ) असली तरी आजही सुमारे २० लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर तहान भागवत असल्याचं विदारक चित्र मराठवाड्यात आहे.

पाणीटंचाईकडं कुणाच लक्ष नाही मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वादळी वाटप; प्रक्रिया सुरुच, आकडा 9 लाखापर्यंत जाण्याचा अंदाज

हे पाणीटंचाईचं संकट कधी कमी होणार याची प्रतिक्षा करत मराठवाड्यातील १३६० गावे ५८३ वाड्या १९३८ टँकरने येणाऱ्या पाण्याने आपली तहान भागवत आहेत. मराठवाडा विभागातील सुमारे १० टक्के जनता पाण्यासाठी वणवण करत आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपली, निकाल लागला. केंद्रात सरकार स्थापन झालं. जय-पराजयाचं एकमेकांवर खापर फोडून झालं. मात्र, पाणीटंचाईकड काही कुणाच लक्ष गेलं नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावं आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. आता १९ जूनपर्यंत १९३८ टँकरचा आकडा आहे.

वाढता वाढले टँकर

जानेवारी महिन्यात जालना जिल्ह्यात ७६ टँकरने, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९ पाणीपुरवठा सुरू होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर गेली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १८३७ वर टँकरचा आकडा गेला. जून महिन्यात १९३८ टँकर सुरू झालं. ४२२१ विहिरींचे अधिग्रहण केलं आहे.

विभागीय आयुक्त कधी मिळणार

शासनाने मंगळवारी सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु, मराठवाडा विभागीय आयुक्तपद १८ दिवसांपासून रिक्त आहे. किमान टंचाईचा विचार करून तरी आयुक्तांची नियुक्ती लवकर करावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

१३६० गावं, ५८३ वाड्यांवर टंचाई ओबीसी आरक्षणावर पहिला हक्क मराठ्यांचा; मनोज जरांगे पाटलांनी सांगितला  A टू Z इतिहास

सध्या १३६० गावं आणि ५८३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. सुमारे २० लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले आहेत. टँकरची संख्या रोज वाढत आहे. नियमित पावसाळा झाला आहे. सध्या मात्र ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७५ गावे व ७५ वाड्या, जालना ३३४ गावे व ८१ वाड्या, परभणीत २३ गावे व ७ वाड्या, हिंगोली ५ गावे व ५ वाड्या, नांदेड ११ गावे आणि २९ वाड्या, बीड ३८३ गावे व ३५८ वाड्या, लातूर ३१ गावे आणि १६ वाड्या तर धाराशिव जिल्ह्यात ९९ गावांत टंचाई आहे.

जिल्हानिहाय टँकर संख्या

follow us

वेब स्टोरीज