‘आपुलकीची दिवाळी’… मोहिमेतून अमोल बालवडकरांची 15 हजार कुटुंबांना भेट

‘आपुलकीची दिवाळी मराठवाड्यासाठी’ हा सामाजिक उपक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

Amol Balwadkar Celebrates Aapulkichi Diwali

Amol Balwadkar Celebrates Aapulkichi Diwali : मराठवाड्यातील बांधवांसाठी दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी ‘आपुलकीची दिवाळी मराठवाड्यासाठी’ हा सामाजिक उपक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत तब्बल 15 हजार मराठवाड्यातील बाणेर, बालेवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी दिवाळीचा सरंजाम देण्यात येणार आहे. बालवडकर यांच्यावतीने गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो.

हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. 17 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 5 वाजता बालेवाडी हायस्ट्रीट मैदान, कमिन्स कंपनीसमोर, बालेवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक तथा माजी अध्यक्ष, पुणे शहर सुधारणा समिती अमोल बालवडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित असणार आहेत.

दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविणे, विशेषतः मराठवाड्यातील गरजू कुटुंबांसाठी हा उपक्रम राबविणे हीच खरी आपुलकी आहे, असं मत अमोल बालवडकर यांनी व्यक्त केलं आहे.

follow us