Download App

Ambadas Danve : शेतकरी वाऱ्यावर… राज्य सरकार मुंबई, महाराष्ट्राला लुटतेय!

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात कापूस पिकवच आहे. या कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस सरकारने खरेदी केला पाहिजे. परंतु, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन कापूस खरेदी करण्याऐवजी ऑस्ट्रेलियातून ज्यादा दर देऊन कापूस खरेदी करत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबई, महाराष्ट्राला राज सरकार लुटण्याचे काम करत आहे, अशी सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर (State Government)  केली.

Aaditya Thackeray : सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांची दिशाभूल…

राज्य़ विधीमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. २७) पासून सुरु झाले. तत्पूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला. अंबादास दानवे म्हणाले की, खरंतर राज्यातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचा कापूस पिकवला आहे. या शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देऊन तो सरकारने खरेदी करायला हवा होता. मात्र, येथील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑस्ट्रेलियातून ज्यादा दर देऊन कापूस खरेदी करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

Sanjay Raut मंत्रालयाजवळचे झाड हलवा… भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं पडतील!

खरंतर राज्यात कांद्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात झाला आहे. परंतु, भाव पडलेले आहेत. जरभरात कांद्याची मोठी मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांदा खरेदी करुन तो निर्यात करायला हवा. मात्र, राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी प्रकार असून याविरोधात आम्ही अर्थ संकल्पीय अधिवेशानात आवाज उठवणार आहोत, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Tags

follow us