Ambika Sarkar : ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचं निधन!

Ambika Sarkar Death : साहित्यिक अंबिका सरकार यांचं पुण्यातं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबिक सरकार यांचं 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अंबिका सरकार यांच्यावर याआधीच पती आणि तीन अपत्यांच्या निधनाने दुखाचा डोंगर कोसळला होता. अंबिका सरकार यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वाचकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं […]

Ambika Sarkar

Ambika Sarkar

Ambika Sarkar Death : साहित्यिक अंबिका सरकार यांचं पुण्यातं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबिक सरकार यांचं 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अंबिका सरकार यांच्यावर याआधीच पती आणि तीन अपत्यांच्या निधनाने दुखाचा डोंगर कोसळला होता. अंबिका सरकार यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वाचकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या.

अंबिका सरकार यांनी स्वतः केलेल्या मूल्यामूल्य विवेकातून महिलांच्या जीवनातील सु:दुखांचा वेध आपल्या लिखाणातून मांडला. त्यांनी ‘प्रतिक्षा’, चाहूल, हे दोन कथासंग्रह आणि ‘एका श्वासाचं अंतर’ या कादंबरीचं लेखन केलं.

अंबिका सरकार यांचा जन्म 29 जानेवारी 1932 साली मुंबईत झाला. अंबिका नारायण भिडे असं त्यांचं मूळ नाव असून त्यांनी गिरगावातील शारदा सदनमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर विल्सन महाविद्यालयातून त्या बी. ए. झाल्या.

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅंडिग

मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 1954 साली त्यांनी एम. ए. पदवी संपादन केली. 1955 ते 1960 पर्यंत एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर 1992 साली निवृत्त होईपर्यंत त्या सिडन्हॅम कॉलेज येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका राहिल्या.

दरम्यान, अंबिका सरकार यांचे थिऑसफी आणि बौद्धधर्म हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी भिक्खू संघ रक्षित यांच्या ‘हिस्टरी ऑफ माय गोइंग फॉर रेफ्यूज’ या पुस्तकाचा ‘माझ्या शरण गमनाचा इतिहास’ आणि ‘द बोधिसत्त्व आयडिअल’ या पुस्तकाचा ‘बोधिसत्त्व आदर्श’ हा अनुवाद त्यांनी केला होता.

अंबिका सरकार यांच्या कादंबऱ्या :
एका श्वासाचं अंतर, अंत ना आरंभ ही, चाहूल, प्रतीक्षा, शांतवन

Exit mobile version