Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी लोणावळा येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळ्या खाईल, पण कुराण…; नवनीत राणांकडून हिंदुत्ववादाचा एल्गार
आठवले यांनी माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले, पहलगामध्ये दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळं मी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या आणि पाकिस्तानी पाकव्याप्त काश्मिर देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळं तो भाग भारतात घेणं आज आवश्यक झालं आहे, असं आठवले म्हणाले.
पाकिस्तानने देखील तो परिसर सोडावा, अन्यथा आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, आमचे सरकार याविषयी गंभीर आहे, विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, असं आठवले म्हणाले.
दरम्यान, आठवलेंनी लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. येथील पर्यटन विकासाला चालना देण्याऱ्या प्रकल्पांना निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राणा काय म्हणाल्या?
नवनीत राणा म्हणाल्या, पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून आमच्या बहिणींना धर्म विचारण्यात आला, त्यांना कलमा म्हणण्यास सांगण्यात आलं. पण त्यांना कलमा वाचता आल्या नाही, तेव्हा दहशवाद्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीच्या डोक्यात गोळ्या घातल्या. आमच्या हिंदू भावांनी गोळ्या खालल्या, पण ते कलमा वाचायला तयार झाले नाहीत. माझा मुलगा लहान आहे, मी त्याला विचारले की कलम (कुराण) वाचणार का? तर तो म्हणतो की, मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत राणांनी आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.