Amit Shah : पुणे, मुंबईच्या आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकार पुढं सरसावलं, अमित शाह यांची घोषणा…

देशातल्या सात शहरांच्या आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांसाठी आपत्ती निवारणासाठी 25 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली आहे. दिल्लीत पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आलीय. Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून […]

Amit Shah

Amit Shah Disaster Relief

देशातल्या सात शहरांच्या आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांसाठी आपत्ती निवारणासाठी 25 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली आहे. दिल्लीत पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आलीय.

Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव

देशातील मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा या योजनेमध्ये समावेश असणार आहे. या सात शहरांमध्ये पुराचा धोका आणि भुस्खलन रोखण्यासाठी 8 हजार कोटींच्या तीन योजना जाहीर करण्यात आल्या असून अग्निशमन सेवेच्या आधुनिकीकरणआसाठी 5 हजार कोटींची मदत देण्यात असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलंय.

पवारांना धमकी देऊन गृहखातं हलविणारा कोण आहे सागर बर्वे? जाणून घ्या

तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये आपत्तीची भीती आहे, अशा 350 जिह्यांमध्ये आपत्ती मित्र तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जवळपास 8 हजारांपेक्षा अधिक आपत्ती मित्र आहेत. आपत्ती मित्र असलेलं महाराष्ट्र राज्यातलं पहिलं राज्य आहे.

दरम्यान, राज्यात कोणतीही आपत्ती आल्यास निवारणाची उपाययोजना जलदगतीने कशी सोपी होईल, तसेच उपाययोजनांची अंमलबजावणीसह वीजनिर्मिती आवश्यक असल्याच्या सूचना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बैठकीत दिल्या आहेत.

Exit mobile version