Amit Shah On Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आज भाजपकडून शिर्डीमध्ये (Shirdi) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
या अधिवेशनात बोलताना शरद पवार यांनी 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले होते मात्र त्या राजकारणाला 20 फुट जमिनीत गाडण्याचे काम केले अशी टीका अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केली.
या अधिवेशनात बोलताना अमित शाह म्हणाले की, 1978 पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं तेसुद्धा जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केलं. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत अस्थिरतेचे राजकारण सुरू होते मात्र आता स्थिर सरकार आले आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना लोकांनी जागा दाखवून दिली अशी टीका देखील त्यांनी केली.
2024 भाजपसाठी महत्वाचे
2024 भाजपसाठी महत्वाचे राहिले असं देखील अमित शाह म्हणाले. 2024 मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. तर हरियाणा, सिक्कीम आणि महाराष्ट्रात भाजपला सलग तिसऱ्यांदा जनादेश मिळाला. तर ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आणि आंध्र प्रदेशात एनडीएला पहिल्यांदाच बहुमत मिळाले, असेही यावेळी अमित शाह म्हणाले.
लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांमुळे आपला विजय
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांमुळे आपला विजय झाला आहे. तसेच या निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि अजित पवारांची खरी एनसीपी आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. तसेच 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.
उद्धव ठाकरेंना जागा दाखवली अन् शरद पवारांना …, अमित शाहांची जहरी टीका
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सभापती राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.