राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी आगामी काळात या निवडणूका पार पडतील. तसेच लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.
अमित शहा आजपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. आज, शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ते पोहचतील. साडेसात पासून रात्री उशिरापर्यंत ते सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. रविवारी सकाळी राजभवनमधून हेलिकॉप्टरने अमित शहा नवी मुंबईतील खारघर येथे पोचतील. सकाळी साडेदहा वाजता तेथे त्यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाईल. यानंतर अमित शहा गोव्याला जाणार आहेत.
Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत
पण अमित शाह आज मुंबईमध्ये येत असले तरी भाजप नेते चंद्रकांत पाटील मात्र आज कोल्हापुरात असणार आहेत, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर अमित शाह यांची नाराजी कायम असल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे काही दिवसापूर्वी अमित शाह यांनी भाजपच्या नेत्याकडे नाराजी व्यक्त केली होती.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडतानाचं शिवसेनेचं योगदान नसल्याचा म्हटलं होत. ते म्हणाले होते की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं बाबरी आंदोलनात योगदान नाही. शिवसेनेचा कोणीही नेता बाबरी पडताना तिथे नव्हता.
Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चा सुरु झाला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.
बाळासाहेबांचा एवढा अपमान आतापर्यंत कोणी केला नाही, तो या मुख्यमंत्र्यांना कसा सहन झाला? आता चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिल.